वैराग ता.10: नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात वैऱागच्या साई आयुर्वेद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या "व्हाय नॉट" या एकांकिकेचा विशेष गौरव करण्यात आला.
स्पंदन २०२६ या विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक महोत्सवात पुणे विभागातून प्रथम क्रमांक पटकावत या एकांकिकेने प्रेक्षक व परीक्षकांची मने जिंकली होती.
नाशिक येथे झालेल्या विद्यापीठाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे पद्मश्री चैत्राम देवचंद पवार, सन्माननीय अतिथी पद्मश्री पोपटराव बागुजी पवार, विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. संजीव अर्जुनराव सोनवणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या यशामागे महाविद्यालयाचे मार्गदर्शक धाराशिवचे सह आयुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील, संस्थाध्यक्षा डॉ. मीरा सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. साहेबराव गायकवाड, विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, सिनेकलाकार योगेश आरोटे आदींचे मार्गदर्शन लाभले.
साई आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थी शाशित संघाचे अध्यक्ष डॉ. प्रीतम आप्पासाहेब इंगळे यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांनी सादर केलेली "व्हाय नॉट" ही एकांकिका सामाजिक आशय, प्रभावी अभिनय आणि दमदार सादरीकरणामुळे विशेष चर्चेत राहिली.
या एकांकिकेचे दिग्दर्शन मष्ना मामीलवाड व मयुरी भीमदे यांनी केले असून लेखन अभिषेक पवार व श्रेय माने यांचे आहे.
एकांकिकेतील कलाकारांमध्ये आकांक्षा पाटील, प्रतीक गुजर, अनिकेत गाडेकर, सोहम कांबळे, स्नेहल ओव्हाळ, वैष्णवी तट्टू, सुनील नवघरे, ऋतिका धोत्रे, कृष्णा पागिरे आणि पार्थ नानावरे यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत सामाजिक विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या या एकांकिकेमुळे साई आयुर्वेद महाविद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

